फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरला मारहाण: भाजप कार्यकर्त्यांकडून 'दहशत' माजवण्याचा प्रयत्न?
फलटण, (दि. ९ डिसेंबर २०२५): फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका प्रामाणिक डॉक्टरला पेशंटच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याच्या घटनेनंतर, आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनी सामूहिक काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या घटनेमुळे आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. विशेष म्हणजे, मारहाण करणारे कथितरित्या भाजपचे कार्यकर्ते असल्याची चर्चा जोर धरत असून, 'काही महिन्यांपूर्वीच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणा'नंतरही प्रशासनाने फलटण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीच पाऊले उचलली नाहीत, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
मारहाण झालेले डॉ. गायकवाड गेल्या १० वर्षांपासून फलटणमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे सेवा देत आहेत आणि त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीही तक्रार नाही. मारहाणीनंतर सर्व डॉक्टर्स आणि कामगार वर्गाने काम बंद आंदोलन पुकारले आहे.
यावेळी एका डॉक्टरने पत्रकारांशी बोलताना प्रशासकीय अनास्थेवर अत्यंत बोचकी टीका केली:
"आम्ही जनतेच्या सेवेसाठी आहोत आणि त्याचा पगार घेतोय. पण आम्हाला जनतेचा आणि गुंड प्रवृत्तीचा मार खायचा नाहीये. आमची एकच मागणी आहे - भीक नको, पण कुत्रे आवरा
हा संतप्त उद्रेक फलटण रुग्णालयातील वाढत्या राजकीय दबावाचे आणि असुरक्षित वातावरणाचे स्पष्ट संकेत देत आहे.
काही महिन्यांपूर्वी याच रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने राजकीय व प्रशासकीय त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. याच प्रकरणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत उत्तर दिले होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आश्वासन:
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर एसआयटी नेमून चौकशीचे आश्वासन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता या ताज्या आणि थेट मारहाणीच्या गंभीर घटनेवर नागपूर हिवाळी अधिवेशनात काय भूमिका घेणार, असा थेट प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयात घडलेली डॉ. गायकवाड यांच्यावरील मारहाणीची घटना तुम्ही हिवाळी अधिवेशनात घेऊन, डॉक्टरांना आणि कामगार वर्गाला नेमका कसा न्याय देणार?
या दोन्ही घटना दर्शवतात की, फलटण उपजिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांना सेवा देणे किती कठीण झाले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी फक्त चौकशीचे आदेश न देता, राजकीय हस्तक्षेपाला कायमस्वरूपी पायबंद घालण्याची आणि दोषींवर उदाहरणात्मक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.