वाई आणि फलटण तालुक्यात सापळा रचून तिघांना अटक; एका विधिसंघर्षित बालकाचा समावेश
लोणंद: दरोडा, घरफोडी, चोरी, फसवणूक आणि मारामारी यांसारख्या विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या दीड ते दोन वर्षांपासून फरारी असलेल्या तीन संशयित आरोपींना लोणंद पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईमुळे लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला आहे.
अटक केलेल्या संशयितांची नावे:
अशी केली कारवाई
लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला (Detections Branch) विविध गुन्ह्यांतील फरारी संशयितांचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, पोलिसांनी तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे विविध ठिकाणी छापे टाकले.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
या यशस्वी कारवाईत पोलिस उपनिरीक्षक रोहित हेगडे, सहाय्यक पोलिस फौजदार दिलीप येळे, पोलिस हवालदार राहुल वाघ, पोलिस नाईक बापूराव मदने, पोलिस हवालदार सुनील नामदास, शेखर शिंगाडे, अमोल जाधव, अंकुश कोळेकर, विठ्ठल काळे, अवधूत धुमाळ, जयवंत यादव, संजय चव्हाण, महिला पोलिस हवालदार मेघा ननावरे आणि स्नेहल कापसे आदींनी सहभाग घेतला.
या तिन्ही संशयितांना आता पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी न्यायालयात हजर केले जाईल.