बारामती/फलटण: ज्येष्ठ नागरिकांना परदेशी पर्यटनाचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला बारामती शहर पोलिसांनी दोन वर्षांच्या प्रदीर्घ तपासानंतर अटक केली आहे. आरोपीने 'सिक्कीम-दार्जिलिंग'च्या टूरचे आयोजन करण्याचे खोटे आश्वासन देऊन बारामतीतील नागरिकांकडून मोठी रक्कम हडपली होती.
आदम मेहबूब सय्यद (रा. पवारवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आदम सय्यद सातत्याने पोलिसांना गुंगारा देत होता आणि त्याला पकडणे पोलिसांसाठी आव्हान ठरले होते.
बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या आरोपीला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली.
पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला आणि त्याला ताब्यात घेतले.
अटक करणारे पथक:
या यशस्वी कारवाईमुळे फसवणूक झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून, आरोपीस लवकरच न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.