डॉ. संपदा मुंडे प्रकरणी उपसभापतींनी घेतली बैठक
मुंबई, दि. ३१ : फलटण तालुक्यातील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मागील दोन वर्षांचा विशाखा समितीचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाने या प्रकरणातील चार्जशीट वेळेत दाखल करावे, असे आदेशही दिले.
या प्रकरणातील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीला आयुक्त आरोग्य सेवा डॉ.कादंबरी बलकवडे, आयुक्त सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर हे समक्ष उपस्थित होते. तर दुरदृश्य प्रणालीद्वारे सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, सातारा जिल्हा चिकित्सक डॉ. युवराज कर्पे, फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंशुमन धुमाळ, पुणे विभाग आरोग्य उपसंचालक डॉ. आर. बी पवार सहभागी झाले होते. तसेच राज्य महिला आयोग माजी सदस्या, व अन्य महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. संपदा मुंडे या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी होत्या आणि रुग्णालयातील सर्व सहकाऱ्यांशी त्यांचे संबंध चांगले होते. कोणतीही तक्रार त्यांच्याविरुद्ध नव्हती. पोस्टमार्टम विभागात त्यांच्यासोबत दोन महिला डॉक्टर कार्यरत असून कामकाजात कोणताही दबाव नसल्याचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. रुग्णालयात सुमारे ५० टक्के महिला कर्मचारी कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस विभागाने काही अहवाल रुग्णालयाला सादर केला होता, ज्यावर समितीने चौकशी केली. तथापि, कोणतीही विभाग