फलटण एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या खेळाडूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि. रायगड यांच्यामार्फत आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश संपादन करत महाविद्यालयाचा आणि फलटण तालुक्याचा गौरव वाढवला आहे. बुद्धिबळ, खो-खो आणि व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारात खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे.
*बुद्धिबळात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*
मेढा फार्मसी कॉलेज, मेढा (जि. सातारा) येथे नुकत्याच झालेल्या कोल्हापूर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उज्ज्वल यश मिळवले. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील १८० खेळाडूंनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यातून, गुणांकनाच्या आधारावर महाविद्यालयाचे दोन बुद्धिबळपटू कु. श्रीराज संजय नेवसे आणि कु. साक्षी धनाजी जगदाळे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या राज्यस्तरीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
*खो-खो मध्ये तीन खेळाडूंची विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड*
सा.रे. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरोळ (जि. सांगली) येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय खो-खो निवड चाचणी स्पर्धेतून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या तीन खेळाडूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये कु. गीतांजली राजेंद्र जाधव, कु. समृद्धी अजित भिसे आणि कु. सुजल किसन गाडगे यांचा समावेश आहे. या खेळाडूंनी पाच जिल्ह्यांमधून आपलं स्थान निश्चित केलं आहे.
*महिला व्हॉलीबॉल संघाने साधली यशाची हॅट्रिक!*
मसूर फार्मसी कॉलेज, मसूर (ता. कराड) येथे आयोजित कोल्हापूर विभागीय महिला व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटणच्या संघाने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपदाचे यश मिळवून यशाची हॅट्रिक साधली आहे. संघाच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
याच स्पर्धेत महाविद्यालयाची खेळाडू कु. माया दादा ढवळे हिला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू (Best Player) म्हणून पुरस्काराने गौरवण्यात आले. तिच्या या विशेष कामगिरीबद्दलही सर्वत्र अभिनंदन होत आहे. या विजय संघात कु. माया दादा ढवळे( कर्णधार), कु. आदिती तायाप्पा राऊत( उपकर्णधार),कु. शर्वरी सुरज कचरे ,कु. नंदिनी महेंद्र पवार, कु. आकांक्षा राजेंद्र पठारे, कु. अमृता रवींद्र कवितके, कु. सृष्टी राजेश कर्वे, कु.श्रावणी सचिन आफळे, कु. मानसी रतन जाधव, कु. कोमल सोमनाथ कर्चे, कु. आदिती विलास देशपांडे, कु. साक्षी शरद चिंचकर या खेळाडूंचा समावेश होता.
*यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन*
या सर्व यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. तायाप्पा शेंडगे यांनी मार्गदर्शन केले.विद्यापीठ स्तरावर निवड झालेल्या आणि उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सर्व खेळाडूंचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, क्रिडा समिती चेअरमन शिवाजीराव घोरपडे, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कुमार दळवी आणि सर्व प्राध्यापक वृंद यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे आणि त्यांना पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.