पुणे (प्रतिनिधी) : महाराणी येसुबाईंचा (राजमाता राजाऊ साहेबांचा ) २९५ वा. " स्मृतिदिन " रविवार दि.२१ डिसेंबर रोजी पुणे लोहगाव येथील साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी मध्ये संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक, येसुबाईंचे वंशज, राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष मा. दिपकराजे शिर्के उपस्थित होते.*
*महाराणी येसुबाईंच्या माहेर कडील श्रीमंत राजे शिर्के घराण्यातील वंशजांनी येसुबाईंचा जयंती सोहळा व स्मृतिदिनाचे आयोजन करून राजमाता राजाऊंचे (येसुबाईंचे) स्मरण करण्याबाबत नुकतेच प्रबोधनात्मक आवाहन केले होते. त्यानुसार पत्रकार व इतिहास अभ्यासक लक्ष्मीकांत राजेशिर्के यांच्या आवाहनाला राज्यभरात जोरदार प्रतिसाद मिळाला असून, समस्त शिर्के परिवारांनी, गडदुर्ग संवर्धकांनी , लेखक, इतिहास प्रेमींसह शिव-शंभुभक्तांनी राज्यभरात ठिकठिकाणी स्मृतिदिनाचे आयोजन करून महाराणी येसुबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्वराज्य कार्याची माहिती देऊन येसुबाईंच्या चरणी विनम्र अभिवादन केले.*
*त्याप्रमाणे पुणे लोहगाव येथील साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमीत ही प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी येसुबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संस्थेचे कार्याध्यक्ष व राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष, वंशज श्रीमंत दिपकराजे शिर्के यांनी बोलताना येसुबाईंच्या जीवनातील कर्तव्य, शौर्य, त्याग, संस्कार आदी विषयांवर आधारित थोडक्यात राजमाता राजाऊंच्या जीवनावर व्याख्यान दिले. आता इथून पुढे सर्वांनी राजमाता येसुबाईंना २७ जुलै रोजी जयंती दिवशी व २१ डिसेंबर रोजी स्मृतिदिनाला स्मरण केले पाहिजे. शिव-शंभुभक्तांनी घराघरात येसुबाईंची प्रतिमा लावली पाहिजे तसेच त्यांचे आदर्श विचार तरूणांनी आंगीकारले पाहिजेत असे प्रबोधनात्मक आवाहन ही राजेशिर्के यांनी केले. यावेळी प्रशिक्षण संस्थेचा शिक्षक स्टाफ, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.*
*जय जिजाऊ , जय राजाऊ..!*
*जय शिवराय , जय शंभुराजे..!*