*डॉ. प्रसाद व डॉ. प्रसन्न जोशी परशुराम पुरस्काराने आणि डॉ. धनश्री जोशी - दांडेकर शारदा पुरस्काराने सन्मानित
फलटण दि. २२ : आपल्या जीवनात प्रत्येकाने संयम, चिकाटी, प्रेम, अचूकता आणि व्यवसायात सच्चेपण आचरणात आणल्यास आनंदी जीवनाची ती गुरुकिल्ली ठरेल असे प्रतिपादन येथील निष्णात अस्थिरोग शल्य चिकित्सक डॉ. प्रसाद जोशी यांनी केले.
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक, केंद्र - फलटण यांच्यावतीने नवलबाई मंगल कार्यालय, फलटण येथे आयोजित परशुराम व शारदा पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अजय श्रीनिवास दाते होते. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक कार्यालयाचे कार्यवाह डॉ. सुहास भणगे, फलटण केंद्र प्रमुख विजय ताथवडकर, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. प्रसन्न जोशी, डॉ. संध्याताई भिडे, डॉ. धनश्री जोशी - दांडेकर, डॉ. अवधूत गुळवणी, डॉ. हेमलता गुळवणी, श्रीपाद विभुते, संजय दाते यांचे सह कार्यकारणी सभासद व निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा यावर्षीचा परशुराम पुरस्कार डॉ. प्रसाद जोशी व डॉ. प्रसन्न जोशी या जुळ्या भावंडांना आणि शारदा पुरस्कार शिक्षण व मनसोपचार तज्ञ डॉ. धनश्री जोशी - दांडेकर, दापोली यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. ५००१ रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे. सदर पुरस्कार कै. काशीनाथ वादे व कै. सत्यभामा लेले यांच्या कुटुंबीयांमार्फत त्यांच्या स्मरणार्थ दिले जात असल्याचे यावेळी आवर्जून सांगण्यात आले.
प्रत्येकाला योग्य सत्संग व गुरु मिळाला तर भाग्यही मिळते हे आजच्या पुरस्काराने दाखवून दिल्याचे निदर्शनास आणून देत भगवान परशुराम यांच्या चिरंजीव अवताराने पृथ्वीतलावर चांगले दिवस पहात आहोत याची ग्वाही देत त्यांचे संपूर्ण जीवन चरित्र अध्यक्षीय भाषणात अजय श्रीनिवास दाते यांनी मांडले.
आपण उच्च शिक्षण घेतल्यानंतर आयुष्यातील बरीच वर्ष अमेरिकेत वास्तव्य केले. आई - वडिलांचा सहवास कमी लाभल्याचे सांगून तरुण पिढीने आपल्या जीवनात तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रगती साधावी, समाजासाठी परोपकाराची भावना ठेवून कार्य करावे आणि उत्तुंग यश संपादन करावे अशी अपेक्षा डॉ. प्रसन्न जोशी यांनी व्यक्त केली.
शिक्षण क्षेत्रातील कार्यामुळे आपल्याला आज शारदा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एवढ्या कमी वयात माझे कार्य पाहून हा पुरस्कार दिल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त करीत या पुरस्कारामुळे आपल्या क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त करीत डॉ. धनश्री जोशी - दांडेकर आहे यांनी आपले बालपण व शिक्षण फलटण येथेच झाल्याचे आवर्जून सांगितले.
डॉ. प्रसाद जोशी यांनी प्रारंभी काही काळ आमच्या समवेत कार्य केले असून आज २५ वर्षे त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याला होत असून आपल्या व्यवसायांबरोबरच त्यांनी फलटण व परिसरात सामाजिक व सांस्कृतिक ठेवा वृद्धिंगत केला असून त्यांची जिद्द, चिकाटी सर्वांनाच प्रेरणादायी ठरणारी असल्याचे गौरवोद्गार डॉ. संध्याताई भिडे यांनी व्यक्त केले.
प्रारंभी दीप प्रज्वलन व भगवंत परशुराम यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. केंद्र प्रमुख विजय ताथवडकर यांनी सर्वांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात फलटण केंद्राच्या कामकाजाचा आढावा सादर केला.
निमिष विष्णूप्रद याने आंतरराष्ट्रीय पातळीवर रोबोट स्पर्धेत मिळविलेल्या उज्वल यशाबद्दल परिवारासह त्याचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांची ओळख निखिल केसकर, अनिरुद्ध रानडे व सौ. अस्मिता रानडे यांनी करुन दिली. प्रा. डॉ. माधुरी दाणी, निखिल केसकर यांनी सूत्रसंचालन आणि समारोप व आभार प्रदर्शन नंदकुमार केसकर यांनी के
ले.