फलटण (प्रतिनिधी) : आगामी फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मध्ये माजी नगरसेविका सौ. वैशाली सुधीर अहिवळे यांचे नाव महिला उमेदवारांमधून जोरदार चर्चेत आले आहे. दोन पिढ्यांचा प्रदीर्घ राजकीय वारसा असलेल्या आणि स्थानिक पातळीवर मोठा दबदबा निर्माण केलेल्या वैशाली अहिवळे यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता अत्यंत प्रबळ मानली जात आहे.
राजकीय वारसा आणि कुटुंबाचा प्रभाव
अहिवळे कुटुंबाला फलटणच्या राजकारणात मोठा मान आहे. वैशाली अहिवळे यांचे सासरे कै. तानाजीराव अहिवळे हे फलटण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष होते, तर त्यांच्या थोरल्या जाऊबाई श्रीमती स्वाती आशिष अहिवळे यांनीही उपनगराध्यक्षपद भूषवले आहे. यामुळे अहिवळे कुटुंबाकडे राजकारणाची मोठी शिदोरी तसेच जनतेच्या विश्वासाचा मोठा ठेवा आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सकारात्मक दृष्टिकोन
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कार्यक्षम, प्रभावी आणि लोकांमध्ये कार्याचा ठसा उमटवलेल्या व्यक्तींना संधी देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या निकषांवर सौ. वैशाली अहिवळे पूर्णपणे उतरत असल्याने, प्रभाग २ मध्ये त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
पती सुधीर अहिवळे यांचे सक्रिय सामाजिक कार्य
वैशाली अहिवळे यांचे पती सुधीर अहिवळे हे स्वतः एक ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी फलटण शहरात अनेक सामाजिक उपक्रम, गरजू व्यक्तींना मदत तसेच महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले आहे. त्यांच्या या मजबूत लोकसंपर्काचा आणि कार्याचा फायदा वैशाली अहिवळे यांना स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात होत आहे.
लोकांमध्ये लोकप्रियता आणि सामाजिक कार्याची छाप
वैशाली अहिवळे या स्थानिक स्तरावर महिला मतदारांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. त्यांनी रस्ते, पाणी, आरोग्य आणि महिलांशी संबंधित समस्यांवर नेहमीच पुढाकार घेतला आहे. अहिवळे यांचे थोरले दिर कै. आशिष अहिवळे यांचे युवक संघटन आणि सामाजिक कार्य अनेकांना आजही प्रेरणा देत आहे. त्यांच्या कार्यामुळे प्रेरित झालेले अनेक सहकारी आजही अहिवळे कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
प्रभाग २ मधील निवडणूक मोठी चुरशीची होणार यात शंका नाही, पण फलटणकरांचे लक्ष आता वैशाली सुधीर अहिवळे या प्रबळ महिला उमेदवाराकडे लागले आहे.