फलटण प्रतिनिधि:-जन्म :- १५ ऑक्टोबर १९४७.जन्म ठिकाण :- नाशिक.शिक्षण :- एल.एम.ई. (आय), (मेकॅनिकल इंजिनिअर).ज्ञात भाषा :- मराठी, हिंदी व इंग्रजी.वैवाहिक माहिती :- विवाहित, पत्नी श्रीमती मीना.अपत्ये :- एकूण १ (एक मुलगा).व्यवसाय :- शेती.पक्ष :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.मतदारसंघ :- ११९ - येवला, जिल्हा-नाशिक.इतर माहिती :- संस्थापक-अध्यक्ष, मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट, बांद्रा, मुंबई, माजी विश्वस्त, व्हि. जे. टी. आय. संस्था, मुंबई, विश्वस्त, नायर रुग्णालय, विश्वस्त, प्रिन्स आगा स्थान रुग्णालय, मुंबई; संस्थापक, महात्मा फुले समता परिषद, या संस्थेमार्फत उपेक्षित पद-दलित, मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न तसेच, महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहु महाराज यांच्या विचारांचा व आदर्शाचा प्रचार व प्रसार, ५ नोव्हेंबर २०१० रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना मुंबई भेटी दरम्यान महात्मा फुले यांनी लिहिलेल्या "गुलामगिरी" या पुस्तकाचा "स्लेव्हरी" हा अनुवादीत ग्रंथ भेट दिला; माजी विश्वस्त, मुंबई पोर्ट ट्रस्ट, १९८५ "दैवत" व १९९०"नवरा बायको" या मराठी चित्रपटांची निर्मिती; १९७३ सदस्य, १९७३-८४ विरोधी पक्षनेते, १९८५ व १९९१ महापौर, मुंबई महानगरपालिका; याकाळात गृहनिर्माण, झोपडपट्टी सुधारणा, मुंबई शहराचे सौंदर्यकरण, चौकांचे सुशोभिकरण, हुतात्मा चौकाचे सुशोभिकरण केले; १९९१ अध्यक्ष, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्स, १९९१ पर्यंत शिवसेनेत विविध पदावर कार्य; १९९१ नंतर काँग्रेस पक्षात कार्यरत; जून १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य; संस्थापक-सदस्य व जून १९९९ ते नोव्हेंबर १९९९ महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष; १९८५-९०, १९९०-९५, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९ सदस्�