परमपूज्य आचार्य शामसुंदर विद्वांस बाबाजी ,,अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद, तथा श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट दक्षिण काशी फलटण,, महाराष्ट्र शासन तथा देवेंद्रजी यांनी तमाम महानुभाव पंथीयांच्या परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामी यांची जयंती शासकीय समारंभ म्हणून साजरी करण्यासाठी तमाम महानुभाव पंथीय आचार्य प्रवर संत महंत यांचे विचार जाणून घेऊन साजरी करावी, असे सर्व सरकारी अधिकारी यांना GR काढून कळवले आहे, या संदर्भात श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट फलटण येथे झालेल्या ट्रस्टच्या मीटिंगमध्ये आदरणीय देवेंद्रजी यांचे श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टच्या वतीने अभिनंदन करण्यात यावे, असा ठराव विश्वस्त श्री बाळासाहेब ननावरे यांनी मांडला,, व याला सर्व विश्वस्त आदरणीय परमपूज्य सुदामराज बाबाजी, श्री अर्जुनराव नाळे, श्री बाळासाहेब शिंदे, श्री सिताराम शिंदे यांनी पाठिंबा दर्शवला, याप्रसंगी बोलताना कुलाचार्य बाबाजी यांनी देवेंद्रजी म्हणजे महानुभाव पंथ यांना लाभलेले रत्न आहे असे उद्गार काढले, विश्वस्त श्री बाळासाहेब ननावरे यांनी शासनाचे व देवेंद्रजी यांचे आभार मानले