फलटण, दि.२२ :-
फलटण नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या नगरसेवक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून अपक्ष उमेदवार सौ. अस्मिता भिमराव लोंढे यांची नगरसेविका म्हणून निवड झाली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करत मतदारांचा विश्वास संपादन केला.
त्यांच्या या यशाबद्दल प्रभागातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निवडीनंतर बोलताना सौ. लोंढे यांनी नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, मूलभूत सुविधा तसेच महिला व युवकांच्या प्रश्नांवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सौ. अस्मिता भिमराव लोंढे यांच्या निवडीमुळे प्रभाग क्रमांक १ च्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.