फलटण (प्रतिनिधी):नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आता अंतिम टप्प्यात आला असून, फलटणच्या मातीत 'राजे' आणि 'खासदार' गटातील राजकीय युद्ध शिगेला पोहोचले आहे. गुरुवार, १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गजानन चौक येथे राजे गट शिवसेना आयोजित महायुतीची विराट सांगता सभा पार पडणार आहे. विशेष म्हणजे, सकाळी खासदार गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा लावून जो माहौल बनवण्याचा प्रयत्न केला, त्याला सायंकाळी महायुतीच्या 'फायरब्रँड' नेत्यांच्या फौजेने चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी राजे गटाने केली आहे.
खासदार गटाच्या प्रचाराला लगाम घालण्यासाठी राजे गटाने तगडी फळी मैदानात उतरवली आहे. या सांगता सभेला:
हे दिग्गज नेते गजानन चौकातून विरोधकांच्या भ्रमाचा भोपळा फोडणार असून, मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत.
खासदार गटाने सत्तेचा वापर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सकाळी आयोजित केली असली, तरी फलटणच्या जनतेचा कल मात्र सायंकाळच्या राजे गटाच्या सभेकडेच अधिक असल्याचे चित्र दिसत आहे. "सकाळची सभा फक्त खुर्च्या भरण्यासाठी असते, पण सायंकाळी गजानन चौकात जनसागर लोटणार," असा विश्वास राजे गटाच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांत खासदार गटाने केलेल्या दाव्यांचा आणि भूलथापांचा पर्दाफाश या सभेत केला जाणार आहे. फलटणच्या स्वाभिमानासाठी आणि शहर विकासासाठी 'राजे गट' हाच एकमेव पर्याय असल्याचे महायुतीचे हे नेते ठामपणे मांडणार आहेत. या सभेमुळे विरोधकांच्या गोटात आतापासूनच अस्वस्थता पसरली असून, गजानन चौकातील ही सभा निवडणुकीचा निकाल ठरवणारी ठरणार आहे.