राज्यातील गंभीर प्रश्न गृहमंत्र्यांच्या दरबारात! ; सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात खा. नीलेश लंके यांचा समावेश
फलटण:महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता थेट देशाच्या राजधानीत पोहोचला आहे. फलटण येथील स्व. डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या धक्क्यातून जिल्हा सावरत असतानाच, आता या प्रकरणाची झळ केंद्र सरकारलाही बसली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून, यात खासदार निलेश लंके यांनी डॉ. संपदा मुंडे प्रकरणावरून आक्रमक पवित्रा घेतला.
या भेटीदरम्यान खा. निलेश लंके यांनी फलटणच्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचा मुद्दा अत्यंत गांभीर्याने मांडला. "एका उच्चशिक्षित डॉक्टर महिलेला टोकाचे पाऊल उचलावे लागते, ही खेदाची बाब आहे. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे," अशी रोखठोक मागणी लंके यांनी अमित शाह यांच्याकडे केली. मुंडे कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांनी न्यायासाठी दिल्लीत आवाज उठवला आहे.
खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेलेल्या या शिष्टमंडळाने केवळ वैयक्तिक गुन्हेच नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेक संवेदनशील विषयांवर अमित शाह यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने:
डॉ. मुंडे यांच्या मृत्यूनंतर स्थानिक पातळीवर संताप व्यक्त केला जात होता. मात्र, खा. निलेश लंके यांनी हा विषय थेट देशाच्या गृहमंत्र्यांच्या दरबारी नेल्यामुळे आता प्रशासनावर दबाव वाढणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यास तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.
"डॉ. संपदा मुंडे यांचे जाणे क्लेशदायक आहे. त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही."
— खा. निलेश लंके (केंद्रीय गृहमंत्री भेटीनंतर)