१६ नोव्हेंबर अखेर चालू हंगामातील ऊस दर जाहीर न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा
फलटण - सन २०२५- २६ या चालू हंगामातील ऊस दर जाहीर न झाल्याबद्दल काही शेतकऱ्यांनी स्थानिक प्रशासन व साखर कारखाने यांना निवेदन दिले असून दिनांक १६/११/२०२५ पर्यंत ऊस दर जाहीर करावा, नाईलाजास्तव आम्ही दिनांक १७/११/२०२५ पासून फलटण तालुक्यातील सर्व कारखाने यांचे काटे बंद करून त्याच ठिकाणी उपोषणाच बसू असा इशारा देत सदरचे निवेदन देण्यात आले.
उपविभागीय अधिकारी (प्रांत) फलटण व तहसीलदार फलटण तसेच सर्व साखर कारखाने यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आम्ही आपणास मागील गुरुवार दिनांक ६/११/२०२५ रोजी निवेदन देऊन कारखाना प्रतिनिधी व उत्पादक शेतकरी यांचे संयुक्त बैठक घेऊन लवकरात लवकर चालू हंगामातील दर ऊस दर घोषित करण्याबाबत विनंती केली होती. मात्र आजतागायत कोणताही कारखान्याने दर घोषित न करता कारखाने चालू आहेत दर घोषित न झाल्याने शेतकऱ्यांच्या वर अन्याय होत आहे. तरी आपण स्वतः दिनांक १६/११/२०२५ पर्यंत ऊस दर जाहीर करावा, नाईलाजास्तव आम्ही दिनांक १७/११/२०२५ पासून फलटण तालुक्यातील सर्व कारखाने यांचे काटे बंद करून त्याच ठिकाणी उपोषणाच बसणार आहोत असे निवेदन दिले असून यावर रजनीकांत खटके, एस. एम. भगत यांच्या सही असून यावेळी इतर शेतकरी यांच्या उपस्थित सदर निवेदन देण्यात आले.