फलटण: फलटण (जि. सातारा) येथील यशवंत सहकारी बँकेतील कथित ११२ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी धडक कारवाई केली. कराड आणि फलटण शहरात पाच वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून ईडीने खळबळ उडवून दिली आहे. या कारवाईत अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
मंगळवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ईडीच्या पथकांनी कराडमध्ये प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने खालील ठिकाणी तपास करण्यात आला:
दिवसभर चाललेल्या या कारवाईत अधिकाऱ्यांनी बँकेचे रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केली. मात्र, या कारवाईबाबत ईडीच्या अधिकृत सूत्रांनी कोणतीही माहिती देण्यास तूर्तास नकार दिला आहे.
यशवंत बँकेतील या मोठ्या आर्थिक घोटाळ्याबाबत सनदी लेखापाल (CA) मंदार देशपांडे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावरून १२ ऑक्टोबर २०२५ रोजी कराड शहर पोलीस ठाण्यात शेखर चरेगावकर यांच्यासह ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेखापरीक्षणातील धक्कादायक निष्कर्ष:
२०१४ ते २०२५ या कालावधीतील वैधानिक लेखापरीक्षणात अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत:
या कारवाईदरम्यान ईडीने दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एकाला तपासासाठी फलटण येथे नेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ईडीने शेखर चरेगावकर यांचे बंधू शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर यांच्यासह इतर काहींची चौकशी करून माहिती संकलित केली आहे.
दरम्यान, भाजप नेते शेखर चरेगावकर हे कारवाईच्या वेळी बाहेरगावी होते. कारवाईची माहिती मिळताच त्यांनी कराडकडे रवाना झाल्याचे समजते. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि ईडी संयुक्तपणे करत आहेत. यापूर्वीच या प्रकरणातील २२ आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत.
सहकारी बँकिंग क्षेत्रात मोठी ओळख असलेल्या यशवंत बँकेवर 'ईडी'ने धाड टाकल्यामुळे सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या तपासातून आणखी कोणती मोठी नावे समोर येतात आणि जप्त केलेल्या कागदपत्रांमधून घोटाळ्याची व्याप्ती किती वाढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.