सोनवडी खुर्द,ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित कृषी महाविद्यालय फलटण मधिल चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६ अंतर्गत बासुंदी बनविण्याचे प्रशिक्षण गावातील स्त्रियांना दिले.
दुधापासून विविध पदार्थ बनविले जातात त्यातील एक म्हणजे बासुंदी. बासुंदी पासून होणारे फायदे व इतर पदार्थांपेक्षा बासुंदी जास्त काळ टिकून राहते याचे देखील महत्त्व पटवून दिले.
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांनी त्याबद्दल चांगला प्रतिसादही दिला. यावेळी गावातील स्त्रिया उपस्थित होत्या.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, समन्वयक प्रा. एन. एस. ढालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, प्रा. एन. ए. पंडित, प्रा. जी .बी.अडसूळ, प्रा. आर. डी. नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत आदित्य कणसे, आदित्य साबळे, कुणाल काशिद, ऋतुराज पाटील, रोहित वाबळे, विश्वजीत साळुंखे, सोमनाथ ढोपे यांनी यावेळी प्रात्यक्षिक करून दाखवले.