पिंपरी(प्रतिनिधी) वाकड येथील आयआयइबीएम संस्था संचलित इंडस बिझनेस स्कूलमध्ये येथे विजय दिन साजरा करण्यात आला.
यावेळी वीरचक्र प्राप्त विंग कमांडर सुरेश कर्णिक हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते त्यांच्या सोबत लेफ्टन कर्नल सुधीर बर्गे, विंग कमांडर आनंद मानकर, फ्लाईट लेफ्टनंट पार्थसार्थी मुळये, डॉ.जयसिंग मारवाह या मान्यवरांच्या उपस्तित कार्यक्रम पार पडला.
यावेळी कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ फॉलन सोल्जर बॅटल क्रॉस (शहिद जवानांचे प्रतीक) चे अनावरण करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते वीर जवानांना श्रद्धांजली वाहून त्यांचे स्मरण करण्यात आले त्यावेळी बोलताना सुरेश कर्णिक यांनी विजयी दिनानिमित्त जुन्या आठवणीना उजाळा दिला आणी 1971 च्या जुन्या आठवणी जाग्या केल्या, विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेमी राहावे असे त्यांनी आवाहन केले आपल्यामध्ये राष्ट्राची भावना ही प्रथम असली पाहिजे असे मत त्यांनी मांडले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
आय.आय.ई.बी.एमच्या अधिष्ठाता डॉ. पूनम निकम,सह अधिष्ठाता डॉ. विशाल भोळे, कर्नल रवींद्र कुमार, माजी सैनिक यांच्या उपस्थितत कार्यक्रम पार पडला सर्व शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले