फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण अंतर्गत दिनांक 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2025 या कालावधीत होणाऱ्या श्रीमंत मालोजीराजे कृषि प्रदर्शन 2025 च्या मैदानातील मंडप पुजन समारंभ फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुलातील क्रिडा मैदानावर संपन्न झाला. कृषि प्रदर्शनाद्वारे कृषि क्षेत्रातील नवीन संशोधित व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. कृषि क्षेत्राशी निगडित 200 हून अधिक कृषि निविष्ठा कंपन्यांचा सहभाग कृषि प्रदर्शनामध्ये होणार आहे. नामांकित ट्रॅक्टर कंपन्या, शेतीची अवजारे, सेंद्रिय शेती, पशू संवर्धन व संगोपन, डेरी, पोल्ट्री, पॉली हाऊस, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, बीज व रोपे, रोपवाटिका, जैविक तंत्रज्ञान, कृषि उपयोगी पुस्तके, कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान यांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. या कृषि प्रदर्शना दरम्यान विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. भुमि पूजन समारंभ प्रसंगी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, फलटण परिसरातील सर्व पत्रकार, कृषि प्रदर्शन आयोजन समिती, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथील प्राध्यापक व प्राध्यापकोत्तर कर्मचारी उपस्थित होते.
*(शब्द संकलन: डॉ. जी. बी. अडसूळ, कृषि विस्तार विभाग)*