फलटण प्रतिनिधी:जीमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यता प्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या पुढाकाराने हिंदुस्थान फिड्स लिमिटेड, बारामती तर्फे नुकतेच कॅम्पस इंटरव्यूव्हचे महाविद्यालयामध्ये आयोजन करण्यात आले. कॅम्पस इंटरव्यूमध्ये महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला, कॅम्पस इंटरव्यूव्ह प्रक्रियेत वैयक्तिक मुलाखतिचा समावेश होता. यामध्ये उमेदवारांचे तांत्रिक ज्ञान, कार्यानुभव, व्यवस्थापन कौशल्ये तसेच उद्योगातील कामकाजाची समज यांचे मूल्यमापन करण्यात आले. या सखोल प्रक्रियेनंतर हिंदुस्थान फिड्स लिमिटेडमध्ये विविध तांत्रिक पदांसाठी माजी विद्यार्थ्यांची यशस्वी निवड करण्यात आली. सदरील प्रक्रियेमध्ये कंपनीतर्फे एकूण 20 तांत्रिक पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या यामध्ये दोन्ही महाविद्यालयातील एकूण 34 माजी विद्यार्थ्यांनी मुलाखतीसाठी उपस्थिती दर्शवली व यामधून कंपनीतर्फे 19 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. मुलाखत समितीमध्ये हिंदुस्थान फिड्स लिमिटेड, बारामतीचे सहाय्यक व्यवस्थापक श्री. अमोल धायगुडे, वरिष्ठ अधिकारी श्री. महेश खटके, प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, प्लेसमेंट अधिकारी प्रा. ए. ए. शिंदे व डॉ. एन. ए. यादव उपस्थित होते. या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा जिल्हा परिषद, सातारचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, प्लेसमेंट सेल, प्राध्यापकवर्ग यांनी निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. उद्योग व शिक्षण संस्थांमधील समन्वयामुळे विद्यार्थ्यांना व माजी विद्यार्थ्यांना दर्जेदार रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात मिळालेल्या शैक्षणिक व व्यावहारिक ज्ञानामुळेच उद्योगक्षेत्रात यश मिळत असल्याची भावना व्यक्त केली. भविष्यातही अशा प्रकारच्या कॅम्पस इंटरव्यूव्हचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली.
*(शब्द संकलन : डॉ. जी. बी. अडसूळ, सहायक प्राध्यापक, कृषी विस्तार विभाग)*