फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण येथील बाजार आवारातील साप्ताहिक कांदा मार्केटमध्ये दि. २० एप्रिल मंगळवारी १४०९ क्विंटल कांदा आवक झाली असल्याची माहिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण येथील बाजार आवारातील साप्ताहिक कांदा मार्केटमध्ये १४०९ क्विंटल म्हणजे २८१८ पिशवी आवक झाली असून दर प्रतिक्विंटल २०० ते १३०१ पर्यंत निघाले तर सरासरी ७५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर निघाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी दिली आहे.