गोखळी(प्रतिनिधी): फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथे चैत्र पौर्णिमेस ग्रामदैवत दक्षिण मुखी हनुमान आणि खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्ताने मानाच्या बारा गाड्या ओढण्याची शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा ग्रामस्थांनी जोपासली बारा गाड्या ओढण्याचा मान मदने कुटुंबियांकडे असून तिसऱ्या पिढीतीलखंडोबा भक्त बाळासाहेब मदने यांच्याकडे आहे.विधीवत परंपरा जोपासत बारा गाड्या दोराच्या साह्याने एकमेकांना बांधून प्रथम गाडीस परंपरागत पाटील तानाजी गावडे यांच्या घराण्याकडे मान असून त्यांच्या समवेत पोलिस पाटील विकास शिंदे यांच्या श्रीफळ फोडून " बेल भंडारा उधळत करीत यळकोट यळकोट जय मल्हार " जयघोषात बारा गाड्या ओढून परंपरा जोपासण्यात आली..बारागाड्या नंतर ग्रामदैवत दक्षिण मुखी हनुमान पालखी छबिना दारुगोळा , डॉल्बी,पारंपारिक वाद्यांच्या साथीने, शांततेत पार पडला.रात्री खंडोबा मंदिरासमोर वाघ्या मुरळी चा भारदार कार्यक्रम झाला. बारा गाड्या पहाण्यासाठी बारामती, इंदापूर, माळशिरस, फलटण,माण सह महाराष्ट्राच्या विविध भागातून. मोठ्या संख्येने यात्रेकरूनी गर्दी केली होती. यात्रा उत्सव कालावधी मध्ये रामविजय पारायण,अखंड हरिनाम किर्तन सप्ताह, १६८ तासांचे अखंड ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज जप संकुल,कुस्त्या, लोकनाट्य तमाशा, म्युझिकल ऑर्केस्ट्रा आणि ग्रामदैवताच्या आरतीने यात्रेची सांगता झाली