गोखळी वार्ताहार
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील कु. स्वरा योगेश भागवत ने बारा तासात 143 किलोमीटर सायकलिंग करून. व एका मिनिटात 100 पुशप मारून विक्रम केला,व गोखळी येथील बॉडी बिल्डर श्री जगदीश मदने यांनी स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवल्याबद्दल या कामगिरीची दखल घेऊन फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे निंबाळकर(खर्डेकर) व पंचायत समितीचे सदस्य श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर यांनी गोखळी येथे दोघांच्या घरी भेट देऊन शाल, फेटा, श्रीफळ देऊन सत्कार करून कौतुक केले.
यावेळी श्री राधेश्याम जाधव यांनी गोखळी येथील खेळाडू कु. स्वरा भागवत बॉडी बिल्डर जगदीश मदने. कुस्तीपटू कु.श्रुती गेजगे, कु.स्वराज गावडे, माऊली गावडे,अनिकेत गावडे,मंथन गेजगे. कराटेपटू कु.दिपाली मदने खेळाडूंची माहिती दिली,

यावेळी श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर बोलताना म्हणाले की गोखळी येथील सर्व खेळाडूंना जी काही मदत लागेल व साहित्य लागेल मी उपलब्ध करून देतो, व गोखळी ग्रामपंचायतीने कुस्तीसाठी मॅट उपलब्ध करून दिल्याबद्दल गोखळी ग्रामपंचायतीचे कौतुक केले,
यावेळी श्रीमंत विश्वजीतराजे यांनी कु,स्वरा भागवत हिच्या बरोबर पुशप काढून खेळाडू वृत्तीचे दर्शन घडवले, व उपस्थित सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला,
यावेळी जि, प,सदस्य विश्वास दादा गावडे,सरपंच बापूराव गावडे, श्रीराम कारखाना संचालक तानाजी गावडे पाटील ,गोखळी तंटामुक्तीचे अध्यक्ष व सरपंच मनोज तात्या गावडे. उपसरपंच राधेश्याम जाधव. निलेश बुरुंगले सर. संकेत सस्ते. अभिजीत निंबाळकर. बॉडी बिल्डर जगदीश भैया मदने, अक्षय गावडे.सुरज गावडे.व गोखळी येथील मान्यवर उपस्थित होते, राजेंद्र भागवत यांनी सर्वांचे स्वागत केले. व उपसरपंच राधेश्याम जाधव यांनी आभार मानले,