म्हसवड/प्रतिनिधी : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत म्हसवड येथील बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे म्हसवडकरांची डोके दुखी वाढली असुन हि वाढलेली साखळी तोडण्यासाठी शनिवार (ता.१७) रात्री ८ पासुन पुन्हा बेमुदत जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय माण खटावचे प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी म्हसवड येथील व्यापारी व व्यावसाईकांच्या बैठकीत सांगीतले या काळात फक्त हाॅस्पीटल , मेडिकल, गॅस या सुवीधा सुरु राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सुर्यवंशी यांनी सांगितले .
म्हसवड विरकरवाडी रोडवरील हरीओम मंगल कार्यालय येथे वाढत असल्यामुळे माण खटाव तालुक्याचे प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी, माण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, पालिका मुख्याधिकारी सचिन माने, नगराध्यक्ष भगतसिंग विरकर, पालिका उपाध्यक्ष दीपक बनगर, माजी नगरसेवक कैलास भोरे, पृथ्वीराज राजेमाने ,म्हसवड शहर व्यापारी संघटनेचे परेश व्होरा, किशोर सोनवणे अजित केवटे व व्यापारी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी शैलेद्र सुर्यवंशी म्हणाले, गेल्या चार-पाच दिवसापासुन म्हसवड शहरात १४४ कलम लागू केले असताना हि शहरात खरेदीला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असुन या गर्दीत होम आयसोलेश असलेले पाॅजीटिव्ही रुग्ण मंडई, मेडिकल, किराणा दुकानात मोकाट शहरात फिरुन इतरांना बाधीत करत असल्याने म्हसवडची हि वाढलेली बाधीताची साखळी तुटणार कशी उलट . शहरातील प्रत्येक गल्लीत वाडी वस्तीवर बांधीत वाढत आहे तर माण तालुक्यातील प्रमुख असलेल्या प्रांताधिकारी यांनी बैठकीत माणची चुकीची आकडेवारी सांगुन गोंधळ उडवून दिला माणची सर्वाधिक बाधीत संख्या ४ हजार ५४१ रुग्ण काल अखेर बाधित असुन त्यापैकी ८२८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असले तरीही सध्या १८८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत व मृतांची संख्या १३५ झालेली आहे.
हि बाब येथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खुपच चिंताजनक अशी आहे. कोरानाच्या साथीची साखळी तोडण्यासाठी येथील नागरीकांसह व्यापारी व व्यावसाईकांनी स्वयंफूर्तीने जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. यासाठी संपुर्ण म्हसवड कंटेनमेंट झोन म्हणून रविवारी सकाळ जाहिर करण्याचे आदेश देत आहे. म्हसवड शहरातील मेडीकल दुकाने व दवाखाने व्यक्तरिक्त सर्व दुकाने बंद राहतील. नागरिकांना किराणा व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करण्यासाठी व्यवस्था पालिका व व्यापारी यांनी समन्वयातून करावी, घराच्या बाहेर नागरिकांनी पडू नये, शहरास जोडले गेलेले सर्व रस्ते बंद करावेत इत्यादी सुचना श्री सुर्यवंशी यांनी दिल्या. जे नागरिक कोरोना बाधित झाले आहेत व ते होम कॉरंटाईन झालेले आहेत त्या परिसरात पालिकेने जंतू नाशकाची फवारणी करण्याची मागणी या बैठकीतील व्यापारी बंधूनी केली.
म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्र व कोरोना केअर सेंटर मधील कोरोना बाधित रुग्णांसाठी रुग्णवाहिका नसल्याची बाब आरोग्य विभागातर्फे निदर्शनास आणून देताच परेश व्होरा यांनी स्वत:च्या मालकीची मिनी बस रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन या बैठकीत दिले.त्याच प्रमाणे चोरून निम्मे शटर उघडून किंवा शटर बंद आडून जे माल विकतील त्यांचेवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली किशोर सोनवणे म्हणाले रेशनकार्ड वरील या महिन्याचा आलेला माल घेण्यासाठी सुट द्यावी तर पृथ्वीराज राजेमाने यांनी जनता कर्फ्यू बाबत उचित मार्गदर्शन व सुचना नागरीकांना प्रशासनाने त्वरीत देण्यात याव्या जेणे करुन लोकांना अडचण येणार नाही असे पृथ्वीराज राजेमाने म्हणाले सचिन माने म्हणाले शनिवारी रात्री ८ पासुन जनता कर्फ्यू पालिके मार्फत करण्यात येणारी आहे शहरातील सर्व रस्ते बॅरेट लावून बंद करण्यात येणार आहेत त्यामुळे कारण नसताना कोणी ही बाहेर फिरताना दिसणार नाही दिसल्यास फौजदारी कारवाई करणार, पालिकेत आॅनलाईनने तक्रार घेतली जाणार आहे आदी सुचना बैठकीत मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांनी केल्या बैठकीत म्हसवड पोलिस स्टेशनचे पीएसआय विशाल भंडारे म्हणाले नागरीकांनी जनता कैफूचा आदर करुन घरातुन कोणी बाहेर पडणार नाही रविवार पासुन पोलिसांनी स्टॅस जिंकला आहे त्यामुळे उद्यापासुन पोलिसांचे चौकार ष्टकाराची बरसात खरी उद्या पासुन पहाववयास मिळणार आहे त्यामुळे म्हसवडकर जनतेने घरी राहुन सहकार्य करण्याचे आवाहन पीएसआय विशाल भंडारे यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले