फलटण (प्रतिनिधी): बैलगाडा शर्यत क्षेत्रातील वेगाचा शेवट आणि लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेला ओरिजनल पंचम हिंदकेसरी 'सर्जा' याचा वाढदिवस १ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ जल्लोष न करता विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात होत आहे.
सर्जा बैलाच्या वाढदिवसाचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध गायक प्रतिक म्हात्रे यांच्या आवाजातील 'सर्जा' आणि 'बाज्या' या जोडीवर आधारित नवीन गाण्याचे अनावरण करण्यात आले. "वेगाचा शेवट, पंचम हिंदकेसरी सर्जा व वेगाचा शेवट नं २ दुसरा किंग बाज्या" अशा शब्दांत या जोडीचा गौरव करण्यात आला आहे.
वाढदिवसानिमित्त केवळ मिरवणुका न काढता 'सर्जा-बाज्या फॅन्स क्लब' आणि आयोजक कु. जयेश अभिजीत भैय्या पवार यांच्या वतीने समाजहित जपले गेले:
या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन कु. जयेश अभिजीत भैय्या पवार (फलटण) आणि सर्जा-बाज्या फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते. बैलगाडा क्षेत्रातील एखाद्या बैलाचा वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि सामाजिक बांधिलकी जपून साजरा होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.