फलटण :- मा. श्री दीपक चव्हाण यांना जाहीर पाठिंबा. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (डी . पी. आय.) या पक्षाचा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा. श्री दीपक चव्हाण यांना जाहीर पाठिंबा दिला असून या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे प्रदेशाध्यक्ष मा. अजिंक्य भैय्या चांदणे यांच्या आदेशानुसार डी पी आय पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री अमोल इंगळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबाचे पत्र माननीय श्री दीपक चव्हाण व माननीय श्री स संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्याकडे कोळकी येथील जाहीर सभेमध्ये सुपूर्त केले. यावेळी कोळकी व कोळकी पंचक्रोशी मधील माझे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सहकारी सोसायटीचे माझे चेअरमन सदस्य ज्येष्ठ नागरिक युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मातंग समाजाची उरलेली सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी माननीय दीपक राव चव्हाण व श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले